Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारकडून जिल्हा परिषदेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असून शाळा, आरोग्य उपकेंद्र, बंधारे, पिण्याचे पाणी यासाठी प्राधान्य देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी सांगितले.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून राजश्रीताई घुले यांनी शुक्रवारी (दि. 3) पदभार स्वीकारला. नूतन उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनीही पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समस्त महिला वर्गास उजेडाची वाट दाखविणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुन्हा एका महिलेच्या हाती ग्रामीण विकासाची गंगोत्री समजल्या जाणार्‍या झेडपीचा कारभार आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, काँग्रेसचे गटनेते तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे गटनेते सुनील गडाख, समाज कल्याण सभापती उमेश परहर, सदस्य रामहरी कातोरे, माधवराव लामखडे, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, अ‍ॅड. शारदा लगड आदी यावेळी उपस्थित होते.

राजश्रीताई घुले म्हणाल्या, मागील अडीच वर्षांत राज्य सरकारने जिल्हा परीषदेला सहकार्य केले नाही. यामुळे उपाध्यक्ष काळात अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. ते प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परीषदेसाठी दिला जाणारा निधी दुसरीकडे पळविला जातो. तो दुसरीकडे जाऊन न देता जिल्हा परीषदेच्या विकासकामासाठी वापरण्यात येईल. यासाठी प्रयत्न करणार आहे. 9 जानेवारीपासून बचत गटासाठी जिल्हास्तरीय साई जोती प्रदर्शन आयोजित केले असून जिल्ह्यातील बचत गटांनी नोंदी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे घुले यांनी सांगितले.

जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके म्हणाले, काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने एकनिष्ठेचे फळ मिळाले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कृपेने उपाध्यक्ष म्हणून काम करताना शिक्षण आणि आरोग्याला प्रधान्य देणार आहे. जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परीषदेचे सदस्य व अधिकारी यांची एक समिती स्थापन करून जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांना अचानक भेट देऊन कामकाज कसे चालते याची तपासणी करणार आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून जिल्हा परीषदेसाठी जास्तीत जास्त निधी आणून जिल्हा परीषदेचा निधी दुसरीकडे जाऊन देणार नाही, यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांना व काँग्रेस आमदारांना विनंती करणार आहे. जिल्हा परीषदेच्या शाळांची गुणवत्तेत सुधारणा होत असून यापुढील काळात तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञानाचा आधारे घेऊन शाळांमध्ये आणखी सुधारणा करण्यास प्राधान देणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

आणि आनंद झाला…
आज अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारताना सर्व पक्षाचे गटनेते, पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे आनंद झाला. पुढील काळात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाईल व सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील असे जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा राजेश्रीताई घुले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या