सेट परीक्षा लांबणीवर
Featured

सेट परीक्षा लांबणीवर

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रांवर येत्या 28 जून रोजी सेट परीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील तब्बल 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे. परंतु, करोनामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुध्दा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थीती विचारात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थीतीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com