Photo Gallery : धुळ्यात अनलॉक
Featured

Photo Gallery : धुळ्यात अनलॉक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

तब्बल 74 दिवसांनंतर बाजारपेठ फुलली

धुळे – कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शासनाने काहीशी सूट दिल्याने स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार तब्बल 74 दिवसानंतर आजपासून धुळ्यातील बाजारपेठ सुरु झाली आहे.

मात्र यासाठी मनपा प्रशासनाने सम-विषम तारखांना कोणत्या दिशांची दुकाने सुरु राहतील याचे नियोजन केले असून उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त अजिज शेख यांनी बाजारपेठेत पायी फिरून पाहणी केली.

महापालिकेची दंडात्मक कारवाई

लॉकडाऊन कालावधीत शिथीलता देवून आजपासून धुळ्यातील बाजारपेठ खुली करण्यात आली असली तरी महापालिकेने सम-विषम तारखांचे नियोजन केले आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवर दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com