Thursday, April 25, 2024
Homeनगरपाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयास टाळे ठोकले

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयास टाळे ठोकले

पाथर्डी ( ता. प्रतिनिधी) – रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे बर्‍याच वेळ उपचार मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सामजिक कार्यकर्ते व रुग्णांनी रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकत काही काळ रुग्णालय बंद केले. या बाबत अधिक माहिती अशी की, काल शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी एकही डॉक्टर वेळेवर उब्लध नव्हता. हे बर्‍याच कालावधीनंतर लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल हरेर, शहानवाज शेख यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली.

मात्र उडवा उडवीची उत्तरे मिळल. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या मदतीने रुग्णालयाला काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टाळे ठोकत निषेध व्यक्त केला. दुपारनंतर एक डॉक्टर उपल्बध झाला. मग त्यांनतर रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी बोलताना हरेर व शेख म्हणाले, जिल्हा वैद्यकीय अधिकारी मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता अर्ध्या तासाच्या आत तेथे डॉक्टर येतील. पुन्हा त्यांच्याशी भ्रमणध्वनीने संवाद केला त्यांनी मी मिटिंग मध्ये आहे असे उत्तर दिले. तालुक्याच्या विविध भागांतून गोर गरीब रुग्ण येऊन बराच वेळ येथे थांबून आहेत. उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळतच नाही.

- Advertisement -

तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्तीवर काम करतात. कोणीच यांची दखल गंभीरपूर्वक घेत नसून आरोग्य सेवेबाबत येथील प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे. जनतेच्या समस्येवर सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना आता देणे घेणे नाही. रुग्णालयात असा काही कर्मचारी आहेत, की कित्येक वर्षे ते येथेच नोकरी करताहेत. त्यांच्या बदल्या का नाही, स्वछता बाबत तोच ठेकेदार याबाबत आमच्या मनात शंका येत आहे. सध्या सर्वत्र साथीचे आजार असतांना लोकांच्या आरोग्याविषयी सतर्क राहण्याची जबादारी कोणीच आपल्यावर घेत नाही.

येथील जन्मलेल्या बालकांना दोन दिवसापासून तपासणी करण्यात आली नाही. मातेला दिला जाणारा सकस आहार मिळत नाही. रुग्णाला दिला जाणारा आहार ठेका रद्द करण्याचीही मागणी अनिल हरेर, शहानवाज शेख यांनी केली आहे. शासकीय जिल्हा रुग्णालयानंतर शहरी उपजिल्हा रुग्णालयाला सुविधा शासनाकडून प्राधान्याने मिळतात अशा रुग्णालयाची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील रुग्णालयांची का स्थिती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकारी आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या