पारोळा : म्हसवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा ; सरपंचासह ११ पैकी ११ जागांवर विजय
Featured

पारोळा : म्हसवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा ; सरपंचासह ११ पैकी ११ जागांवर विजय

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

राष्ट्रवादीच्या १० वर्षाच्या सत्तेला सुरुंग 

(योगेश पाटील)

पारोळा –

तालुक्यातील म्हसवे गावाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या परिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी समर्थक महा विकास आघाडीचा धुव्वा उडवीत सरपंच पदाच्या उमेदवारास एकूण ११ पैकी ११ जागावर एकतर्फी विजय प्राप्त केला.

राष्ट्रवादीच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. विशेष म्हणजे राज्यात राष्ट्रवादी व सेना महाविकास आघाडीत मित्र पक्ष असताना मात्र म्हसवे निवडणुकीत एकमेकाचे कट्टर विरोधक समजले गेले.

दि.८ रोजी झालेल्या मतदानात ९०.११ टक्के असे विक्रमी मतदान झाल्याने दि. ९ रोजी च्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. यावेळी सकाळी १० वाजेपासून नवीन प्रशासकीय इमारती बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागला एकूण ४ प्रभागासह सरपंच पदाच्या उमेदवारांची मतमोजणी करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com