पंचायत समिती सभापती : आज आरक्षण सोडत
Featured

पंचायत समिती सभापती : आज आरक्षण सोडत

Sarvmat Digital

अहमदनगर – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार आहे. कोणत्या पंचायत समितीला कुणाचे आरक्षण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरता आरक्षण निश्चित करावयाचे आहे. त्यासाठी एकूण 14 सभापती पदांपैकी अनुसूचित जाती – एक, अनुसूचित जाती महिला – एक, अनुसूचित जमाती – एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – दोन, सर्वसाधारण – तीन आणि सर्वसाधारण महिला -चार अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी महसूल उर्मिला पाटील यांनी कळविले आहे.

या सोडतीसाठी नागरिकांनी उपरोक्त ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com