स्पर्धेतून नाशिकमधिल टॅलेंंट तपासण्याची संधी-आर के दास; निवेक बिलीयॉर्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Featured

स्पर्धेतून नाशिकमधिल टॅलेंंट तपासण्याची संधी-आर के दास; निवेक बिलीयॉर्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सातपूर । प्रतिनिधी

निवेक आशोका ओपन-2020 या क्रिडा महोत्सवात शुक्रवारी बिलीयॉर्ड स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे.

निवेकच्या बिलीयॉर्ड कोर्टमध्ये या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धांचा शुभारंभ सिएट लि.चे उपाध्यक्ष आर.के.दास याचंया हस्ते करण्यात आला. यावेळी निवेक अध्यक्ष संदिप गोयल, सरचिटणिस रणजित सींग सौंध, माजी अध्यक्ष राजकुमार जॉली, बिलीयॉर्ड विभागाचे प्रणव संघवी, पंकज खत्री, अशोक हेंबाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बिलीयॉर्ड स्पर्धा चार गटात खेळवल्या जाणार आहेत. त्यात बिलीयॉर्ड ओपन, स्नूकर ओपन, बिलीयॉर्ड हॅण्डीकॅप, स्नूकर हॅण्डीकॅप आया गटात होणार आहेत. प्रत्येक गटातून चार पूरस्कार दिले गाणार आहेत. या स्पर्धेसाठी बिलीयॉर्डच्या दोनही स्पर्धांसाठी 64 तर स्नूकरच्या दोनही स्पर्धांसाठी 100 प्रवेशिका दाखल झालेल्या आहेत. या स्पर्धेत प्रत्येक गटातून 4 विजेते काढले जाणार आहेत.

या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी आर के दास यांनी स्पर्धांच्या माध्यमातून शहरातील बिलीयॉर्ड व स्नूकर प्रेम दिसून येत आहे. या खेळाचे चाहते मोठ्या प्रमाणात असून दिवसागणीक यात वाढच होत राहणार आहे. निवेकच्या या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांची खरी कसोटी तपासली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Deshdoot
www.deshdoot.com