ऑनलाईन आर्थिक व्यवहार थंडावले

ऑनलाईन आर्थिक व्यवहार थंडावले

सार्वमत
नवी दिल्ली – कोरोनाला रोखण्यासाठी देशात सुरू असणार्‍या लॉकडाऊनचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहारही थंडावेल आहेत. फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता मार्च महिन्यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि भीम अ‍ॅपने आर्थिक व्यवहार कमी झाला आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) सीईओ प्रवीण रॉय यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. आर्थिक उलाढाल ठप्प असल्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. दरम्यान, जीवनावश्यक वस्तुमध्ये रोखीने होणाऱया व्यवहारामध्ये पाच ते सहा टक्के वाढ झाली आहे. भाजी दुकानदार, पेट्रोल पंप, विविध बिले भरणा हे स्मार्ट फोनवरून करण्यासाठी आम्ही विशेष मोहिम सुरू केली असल्याचेही रॉय यांनी सांगितले.

15 मार्चनंतरच ऑनलाईन व्यवहारात घट झाली होती. मात्र 24 मार्चनंतर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर यामध्ये मोठी घट झाली आहे. एप्रिल महिन्यांमध्येही ही घट कायम राहिल. मात्र भविष्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहार पूर्ववत होतील, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com