Friday, April 26, 2024
Homeनगरपुढील आठवड्यात कांद्याचे दर कमी होणार

पुढील आठवड्यात कांद्याचे दर कमी होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – 15 डिसेंबरनंतर आयात कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागेल. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातहून कांद्याचं नवं पीक बाजारात दाखल होईल. परिणामी कांद्याची आवक वाढेल. या व्यतिरिक्त एमएमटीसीद्वारे 30 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा जो निर्णय झाला होता, त्याचा पुरवठा 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. परिणामी पुढील आठवड्यात गगनाला भिडणारे कांद्याचे दर उतरू लागतील अशी भीती कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नगर, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात अतिवृष्टी झाली.

त्यात कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गत पंधरा दिवसांपासून गावरान कांद्याची आवक अतिशय मंदावली आहे. त्यात नवीन कांद्याचे पीक कमी असून तोही उशीरा बाजारात येणार असल्याने मध्यंतरीच्या काळात कांद्याचे दर प्रतिक्विंटल 21 हजारांवर पोहचले होते. परिणामी गृहिणींचे आर्थिक बजेट कोसळले. हॉटेल, भेळवाले, ढाब्यावरील कांदा गायब झाला. कांद्याऐवजी ग्राहकांना कोबीची भजी खावी लागत आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने अन्य देशातून कांदा आयातीचा निर्णय घेतला. तुर्की, अफगाणिस्तानचा हजारो टन कांदा बाजारातही आला. 15 डिसेंबरनंतर आयात कांद्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

- Advertisement -

या व्यतिरिक्त एमएमटीसी द्वारे 30 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा जो निर्णय झाला होता, त्याचा पुरवठा 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने लाल कांदा लवकर काढण्याकडे शेतकर्‍यांचा कल असल्याने महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थानिक बाजारात नवीन कांद्याचीही आवक वाढू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या