भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; एक जखमी; नांदगाव औरंगाबाद रस्त्यावरील घटना

भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; एक जखमी; नांदगाव औरंगाबाद रस्त्यावरील घटना

नांदगाव। प्रतिनिधी

कासारीहून नांदगावकडे येणाऱ्या दुचाकीला टँकरने जोरदार धडक दिल्याने   दुचाकीस्वार गोरख इपर नामक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर शुभम पवार नामक युवक हा  गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्यास नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आज दुपारच्या नांदगाव -औरंगाबादरोडवरील सोनाई पोट्री जवळ भरघाव वेगात मोटार सायकल क्रमांक एम.एच ४१ अ वाय ६५१७ भरघाव वेगाने येत असताना क्रमांक एम.एच.एक्स ९००७ टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

यात गोरख बाबुराव इपर व शुभम पवार हे दोन्ही गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी गोरख इपर यांना मयत घोषित केले. तर शुभम याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पोलिसात भादवी ३०४(अ)२७९,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकरचालक घटनास्थळावर फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दिपक सुरवाडकर करीत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com