Featured

शिर्डी महामार्गावर अपघातात एक ठार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील केला फॅ्नटरीजवळ कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना आज (दि.17) दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

संजय पंढरीनाथ रेवगडे (40) रा. पाडळी हे अपघातात ठार झाले आहे. रेवगडे हे स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच.-17/वाय-5340 ने सिन्नरहून मुसळगावला जात असतांना समोरुन येणाऱ्या फॉर्च्युनर कार क्र. एम.एच. 04 एच. ए्नस-9990 ने त्यांना जोराची धडक दिली.

त्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पळून गेला. या अपघातात रेवगडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com