भुसावळ : तलवारी व चाकूसह एकास अटक
Featured

भुसावळ : तलवारी व चाकूसह एकास अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

येथील गौसिया नगर भागात लकी किराणा जवळ जमील ऊर्फ (राजा) तस्लीम शेख वय-23 हा त्याच्या राहत्या घरात तलवार व चाकु सारखे घातक शस्र बागळत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने दि. १० जून रोजी रात्री ९.१० वाजेच्या सुमारास  पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागिय पोलिस अधिकारी गजानन राठोड,पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शना खाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि.अनिल मोरे, पो.ना.रविंद्र बि-हाडे,किशोर महाजन,रमन सुरळकर पो.कॉ.कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी,बंटी कापडणे म.पो.कॉ.वैशाली सोनवणे यांनी  तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले.
तसेच त्याच्या घराची पंचान समक्ष झडती घेतली असता घरा मध्ये लोखंडी पलंगावरील गादीच्या खाली दोन तलवारी व दोन चाकु असा एकुण 900/- रु.कि.चे शस्त्र मिळुन आल्याने त्यावर पो.कॉ.कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादी वरुन भु.बा.पेठ पो.स्टेला भाग 6 गु.र.न 633 /2020 आर्म अँक्ट 4/25 व मु.पो.अँक्ट1991 चे  कलम 37 (1) 3 चे उलघंन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला* असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना किशोर महाजन  करीत आहे
Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com