कोरोनावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे पुरावे नाहीत – आरोग्य मंत्रालय
Featured

कोरोनावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे पुरावे नाहीत – आरोग्य मंत्रालय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचे अद्याप पुरावे नाहीत. याबाबत अजून संशोधन सुरु आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लाझ्मा थेरपीचा वापर न केल्यास यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो असे
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, प्लाझ्मा थेरपीवर बरीच चर्चा सुरु आहे. कोविड 19 साठी देशात काय तर जगभरात कोणतीही मान्यताप्राप्त थेरपी नाही. प्लाझ्मा थेरपीबद्दल कोणताही पुरावा सध्यातरी नाही की, त्याचा उपयोग करोनावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्लाझ्मा थेरपी याबाबतीत अजूनही प्रायोगिक स्तरावर आहे. याबाबत आयसीएमआर (इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) अभ्यास करत आहे. म्हणून हे महत्वाचे आहे की जोपर्यंत आयसीएमआर अभ्यास पूर्ण करत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा थेरपीचा केवळ संशोधन किंवा चाचणीसाठीच वापर करावा. जर आपण मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लाझ्मा थेरपी वापरत नसाल तर ते आपल्या जीवाला धोका देऊ शकते.

कोरोनाची देशातील आकडेवारी
गेल्या 24 तासांत करोनाबाधित 1543 रुग्ण आढळले आहेत. यासह देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 435 वर पोहोचली आहे. आतापर्यंत करोनाबाधित 6 हजार 868 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 23.3 टक्के आहे. तर आतापर्यंत 934 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com