नाशिक : निवेकचे जलतरणपटू राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले
Featured

नाशिक : निवेकचे जलतरणपटू राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिकमधील निवेकच्या जलतरण पटूंनी कौतुकास्पद कामगिरी केली.

या स्पर्धेत एकूण ९५० पेक्षा अधिक खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलींच्या गटात इयाना पटेल हिने ५०० मीटर अंतर ४ : ३: ७५ मिनिटात हे अंतर पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला.

१२ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रिया जोशी हिने २ किलोमीटर अंतर २४ : ५८ : ०४ मिनिटात पूर्ण करून नववा क्रमांक मिळवला. १२ वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य कुवर याने २ किलोमीटर अंतर २३ : ४२ : ३२ मिनिटात पूर्ण केले. आदित्य या गटात २३ वा आला.

याच वयोगटात हेच अंतर जयकुमार याने ३६ : २२ :  ९८ मिनिटात पूर्ण करत ४३ वा येण्याचा मान मिळवला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस दीक्षितने ३ किमी अंतर ३७ : ११ : ०० मिनिटात पूर्ण करून १९ वा क्रमांक मिळवला.

निवेकच्या सर्व जलतरणपटूंना राष्ट्रीय प्रशिक्षक हिरेन बुझरुक यांचे मार्गदर्शन लाभले. निवेकच्या जलतरणपटूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून सर्व खेळाडूंचे अभिनंदन निवेक कमिटी सदस्यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com