1 एप्रिल पासून वृत्तपत्रांचे होणार वितरण
Featured

1 एप्रिल पासून वृत्तपत्रांचे होणार वितरण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई  (प्रतिनिधी) –  मुंबई  केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यंत लागू केलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर काल २५ मार्च रोजी उद्योगमंत्री , सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत विक्रेते प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.  केंद्र व राज्य सरकारने सुरू ठेवावयाच्या सेवा वर्गात प्रसार माध्यमाचा समावेश केल्यामुळे , महाराष्ट्रातील वृत्तपत्रे  1 एप्रिल 2020 पासून प्रसिध्द व वितरीत करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे.
      या बैठकीत निश्चित ठरवलेली कामे  – वृत्तपत्रांचे 1 एप्रिल 2020 पासून प्रकाशन व वितरण पुन्हा सुरू करण्यात येईल,  प्रतींची मागणी विक्रेते आधीच्या दिवशी नोंदवतील, शिल्लक प्रती कंपनी कोणतीही सबब न सांगता परत घेतील, १४ एप्रिल पर्यंत बिल भरण्यास सवलत देणेबाबत कंपन्या सहानुभूतीने विचार करतील, डेपोवर गर्दी केली जाणार नाही अंक वेळेवर पोहोचविले जातील. ( पहाटे ३ ते ७ ), वृत्तपत्रे निर्जंतुक केली जातील. विक्रेत्यांना हँड सॅनिटायझर्स, मास्क कंपन्या पुरवतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांच्या रूग्णालय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल. ( फक्त कोरोना), सोसायट्या / संस्था / वाचकांना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती कंपन्या करतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांना कंपन्या ओळखपत्रे उपलब्ध करून येतील . ( नावे विक्रेते देतील) हे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
Deshdoot
www.deshdoot.com