नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग 13 ची लवकरच पोटनिवडणूक
Featured

नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग 13 ची लवकरच पोटनिवडणूक

Sarvmat Digital

मंगळवारी मतदार यादी होणार प्रसिद्ध

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग 13 मध्ये लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. 3 डिसेंबरला मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

नेवासा शहरातील प्रभाग क्र. 13 मधील क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविका फेरीजबी इमामखान पठाण यांचे नगरसेविका पद अतिक्रमणाच्या कारणावरून रद्द करण्याचा निर्णय झाल्याने त्यांच्या जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी या प्रभागाचा निवडणूक याद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यानुसार या प्रभागातील प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी 3 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. 4 ऑक्टोबर 2019 या रोजी बनवलेली व विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेल्या मतदार यादीत समाविष्ट मतदार निवडणुकीसाठी पात्र असतील. प्रसिद्ध मतदार यादीवर 7 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येतील. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रभागातील मतदान केंद्रांच्या नावासह यादी 12 डिसेंबरला प्रसिद्ध होईल. या पोटनिवडणुकीत विजयी होणार्‍या नगरसेवकाला जवळपास अडीच वर्षांचा कार्यकाल (मे 2022 अखेरपर्यंत) मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com