नशिराबाद : महिंद्रा शोरूम फोडले ; दोन लाखाची रोकड लंपास
Featured

नशिराबाद : महिंद्रा शोरूम फोडले ; दोन लाखाची रोकड लंपास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नशिराबाद, ता.जळगाव (वार्ताहर)-

जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबाद जवळील महिंद्रा शोरूमध्ये चोरी झाली असून यात सुमारे दोन लाख रू. रोख व काही साहित्य लंपास केल्याची घटना दि.२० च्या मध्यरात्रीनंतर घडली.

सविस्तर असे की, नशिराबाद जवळील महिंद्रा शोरूमध्ये वरच्या मजल्यावर शोरूमच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीतून प्रवेश करत तेथे ठेवलेली चाबी घेवून काऊंटर उघडून त्यातील एक लाख ५१ हजार ४८० रू. रोख व इतर किंमती साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले.

हा प्रकार सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे, भुसावळ पोलीस विभागीय अधिकारी श्री.राठोड व पोलीस कर्मचारी हे श्वान पथकासह पोहचून तेथील सखोल चौकशी करत आहेत.

विशाल संभाजी पाटील (शोरूम कॅशिअर) रा. खेडी, ता.जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com