Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘मराठा शुभलग्न’चा झुम वधु-वर परिचय मेळाव्याची चर्चा; दीडशेपेक्षा अधिक मुला-मुलींचा ऑनलाईन सहभाग

‘मराठा शुभलग्न’चा झुम वधु-वर परिचय मेळाव्याची चर्चा; दीडशेपेक्षा अधिक मुला-मुलींचा ऑनलाईन सहभाग

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूमूळे देशभरात लॉकडाऊन आहे. अजूनही परिस्थिती पुर्वपदावर आलेली नाही. याकाळात लग्नसोहळे थांबले आहेत. अगदी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत काही सोहळे पार पडले. अशा सर्व परिस्थितीत विवाह परिचय मेळावे गेल्या अनेक दिवसांपासून थांबले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा शुभ लग्न डॉट कॉम या संस्थेकडून झुम अ‍ॅपच्या माध्यमातून परिचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील जवळपास दीडशेपेक्षा अधिक मुलामुलींनी नोंदणी करून याठिकाणी परिचय करवून दिला.

- Advertisement -

एरव्ही विवाह परिचय मेळाव्यात पालक आपल्या पाल्यासाठी साजेशा वर, वधू शोधण्यासाठी जात असतात. मात्र, पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडलेल्या विवाह मेळाव्यात पालकांसह पाल्यांनीदेखील परिचय मेळाव्यात परिचय करवून दिल्याने परिचय मेळाव्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत रंगली आहे.

सध्या सर्वजन न भूतो न भविष्यती अशा अनुभवाला सामोरे जात आहेेत. गेल्या दोन महिन्यापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या जगाची दिशा बदलली आहे. गेली दोन महिने सर्वजन घरामध्ये आहेत. यापुढे जगायचं असेल, प्रगती करायची असेल ,काही साध्य करायचे असेल तर शांत राहून चालणार नाही. यामूळे हा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले होते असे आयोजक सांगतात.

विवाह संस्थेत प्रत्यक्ष मेळावे बोलविले तर तिथे मुलं-मुली सहसा येत नाहीत. पालकांना मुलांची ओळख करुन द्यावी लागते.मात्र, ऑनलाईन मेळावा घेतल्यामूळे पालकांची उपस्थिती तर होतीच शिवाय, पाल्यदेखील प्रत्यक्ष परिचय करुन देत होते. मुलामुलींसह पालकांनी या ऑनलाईन मेळाव्याचा आनंद घेतला.

एक दिवस ठरवलेला हा मेळावा सलग तीन दिवस ठेवावा लागल्याने येणार्‍या काळात निश्चितच विवाह मेळाव्यांंना नवसंजीवनीच तंत्रज्ञानामूळे प्राप्त झाली असल्याचे दिसून येत आहे.

वधू-वरांचे वय हे न थांबणारे आहे आणि जर वय वाढत गेले तर आपल्या पुढील स्थळांचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत जातात. आधीच हातातले दोन महिने वाया गेले त्यामूळे हा मेळावा घेण्याबाबत आपण निर्णय घेतला. हा निर्णय नवी आशा आणि नवी दिशा देणारा आहे. यातून खुप काही साध्य केले, परिचय मेळाव्याचा नवा मार्गच यातून मिळाला आहे.

हेमंत पगार, संचालक, मराठा शुभलग्न डॉट कॉम

- Advertisment -

ताज्या बातम्या