जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त सर हेनरी ड्युनांत यांच्या स्मृतींना अभिवादन
Featured

जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त सर हेनरी ड्युनांत यांच्या स्मृतींना अभिवादन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

सध्याच्या दुर्धर परिस्थितीत कोणताही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करणे असंयुक्तिक आहे. तरीही रेडक्रॉस सारखी अतिशय क्रियाशील संघटना स्थापणारे सर हेनरी ड्युनांत यांच्या स्मृतींना अभिवादन करणेदेखील गरजेचे आहे. म्हणून किमान उपस्थितीत रेडक्रॉस दिन साजरा करत आहोत . विशेषतः भारतीय रेडक्रॉस संघटनेचे हे शतक महोत्सवी वर्ष. यानिमित्त, कोरोना ला हरवून नव्या उमेदीने काम सुरू करण्याचा संकल्प करू  असे प्रतिपादन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखेचे सचिव मेजर पी.एम.भगत यांनी केले.

याप्रसंगी रेडक्रॉस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर, लेखनिक शशी शर्मा उपस्थित होते. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून आणि समाजमाध्यमांच्या साहाय्याने रेडक्रॉस ला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com