अवघ्या दोन तासात दोन बेपत्ता मुलींचा शोध
Featured

अवघ्या दोन तासात दोन बेपत्ता मुलींचा शोध

Abhay Puntambekar

गुन्हे शोध पथक, इंदिरानगर पोलीसांची कामगिरी

इंदिरानगर | वार्ताहर

घरगुती कारणांवरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या दोन तासात शोध घेऊन गुन्हे शोध पथकाने दोन्ही अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन केली याबाबत आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली घरगुती कारणावरून रविवार (दि २३) रोजी सकाळी ११ वाजता घरात काही न सांगता निघून गेल्या त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या नातेवाईकांकडे दुपारी चार वाजे पर्यंत शोध घेतला असता मुली मिळून आल्या नाही.

त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलींचा अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाचे सूत्र फिरवत त्यानंतर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कालिका मंदिर येथे दोघी अल्पवयीन मुली आढळून आल्या असता त्यांना ताब्यात घेऊन साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पि टि पाटील, उपनिरीक्षक सतीश जगदाळे, रियाज शेख, भगवान शिंदे, यांच्या पथकाने सदर कामगिरी केली

गुन्हे शोध पथकाने अवघ्या दोन तासात दोन्ही अल्पवयीन मुलींना तपास करून आई-वडिलांच्या स्वाधीन केले त्यामुळे परिसरातून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com