नाशिकचा एक अनोखा विवाह सोहळा
Featured

नाशिकचा एक अनोखा विवाह सोहळा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

‘एमएच १५ बँड’ चा नावजलेला ड्रमर विनेश नायर व प्रियंका क्षत्रीय हे विवाह बंधनात अडकले. एम एच १५ हा बँड नासिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धआहे आणि विनेश हा एम एच १५ बँड चा ड्रमर असून ५१ तास न थांबता ड्रम वाजवणारा विक्रमवीर आहे.

या विवाहात सामाजिक जबाबदारी चे भान राखत समाजाला आदर्श घालून दिला. करोना चा वाढता विळखा लक्षात घेता मोजक्या लोकांच्या साक्षीने , साध्या पद्धतीने हा विवाह समारंभ पार पडला. समाजात मनोरंजन सादर करणारा हा एम एच १५ बँड नेआपल्या लाडक्या मित्राच्या लग्नाचे औचित्य साधत ५० जेंबे ड्रम सर्कल चे वादन केले.

समाजात नवचैतन्य जागृत व्हावे,शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य निर्माण व्हावे यासाठी हे वादन करण्यात आले. हजारो वर्षांपासून उपचारात्मक ताल तंत्र वापरले जाते.

ड्रमिंगचे बरेच फायदे आहेत, अभ्यासाने हे दर्शविले आहे की हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देऊ शकते, बुद्धिमत्तेसाठी मदत करते, ताणतणाव कमी करते आणि वेदना कमी करते म्हणून खात्री पूर्वक हा छोटासा प्रयत्न करण्यात आला व नव दांपत्यास अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या गेल्या.

एकट्या तालाने करोना वर विजय मिळविणे शक्य नाही, परंतु तणावग्रस्त वातावरणातून सकारात्मक विचार नक्कीच निर्माण करू शकतो. या अनोख्या सोहळ्यात गाणे नाही तर ती मैफील कसली.

कलाकारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गायक राहूल आंबेकर व सह कलाकार गणेश जाधव यांनी सुरांची जादू बरसली. अशा पद्धतीने साध्या पण अनोख्या रीतीने हा विवाह संपन्न झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com