दोन बेवारस मृतदेह आढळले
Featured

दोन बेवारस मृतदेह आढळले

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी

परिसरातील मुख्य बस स्थानक व वॉस्को चौकात दोन बेवारस मृतदेह आढळले असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. येथील बस स्थानकामागील पायर्‍यांवर ५५ ते ६० वर्षे वयाच्या इसम बेवारस अवस्थेत मृत झाल्याचे आढळले. मृत इसमाचे वर्णन – रंगाने निमगोरा, केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ, उंची ५ फूट ७ इंच, शरीराने सडपातळ, जांभळ्या रंगाचा फुलबाहीचा शर्ट, निळ्या रंगाची पॅण्ट असे त्याचे वर्णन आहे.

तर वॉस्को चौक येथे अति मद्यप्राशन केलेल्या ५५ वर्षे वयाचा इसम मृतावस्थेत आढळला. त्याचे वर्णन – रंगाने गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, उंची ५ फूट ५ इंच, पांढर्‍या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅण्ट असे त्याचे वर्णन असून या दोन्ही मृतदेहांचे नाव व पत्ता माहित नसून कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी नाशिकरोड पोलीस स्थानकात सपोउनि ए.एन. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com