इंदिरानगर : दोन सोनसाखळी चोरट्यांना पकडले
Featured

इंदिरानगर : दोन सोनसाखळी चोरट्यांना पकडले

Abhay Puntambekar

इंदिरानगर पोलीस ठाणे बीट मार्शल आणि गुन्हे शोध पथकाची कामगिरी

इंदिरानगर । वार्ताहर

सोनसाखळी चोरून पलायन करत असताना दोन सोनसाखळी चोरट्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल आणि गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून पकडले

तुषार गोरडे (२४ दातली तालुका सिन्नर), अनिकेत सानप (१८ संगमनेर) असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत सदर संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समजते

गुरुवार ( दि २१) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळा पाथडी रस्ता ते पांडवनगरी रस्त्या दरम्यान एक महिला पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांचा पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने सोनसाखळी ओरबाडून नेण्याचा प्रयत्न केला असता ती हातात न लागल्याने त्यांच्या हातातील पर्स सोडून दुचाकीवरून पळ काढला त्या जोराने चोर चोर असा आरडाओरडा केला तातडीने घटनेची माहिती कंट्रोल रुम ने कळवली.

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल मार्शल रवींद्र राजपूत, दिनेश पाटील, मुश्रीफ शेख यां तिघांना त्या संशयित व्यक्तीचे वर्णन सांगितले त्यानुसार त्यांना दोन व्यक्ती दुचाकीवरून कलानगर येथून जाताना दिसून आले असता त्यांना हटकले असता भगवती चौक या मार्गाने जात असताना पुन्हा एका महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला असता ते दुचाकीवरून घसरून पडताच बीट मार्शल आणि पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील, भगवान शिंदे , राजेश निकम, दीपक पाटील,यांनी पकडले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर संशयित आरोपींना पुढील कारवाई साठी पोलीस आयुक्त कार्यालयात घेेऊन गेल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com