Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहरातून तीन दुचाकी लंपास

शहरातून तीन दुचाकी लंपास

नाशिक | प्रतिनिधी

शहरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने वाढत चालल्या असून एकाच दिवशी ३ दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर, इंदिरानगर व आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

किरण निवृत्ती उगले (रा. दत्तमंदिर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची एमएच १५, एफडब्लु ५०२३ क्रमांकाची ३० हजार रूपये किंंमतीची दुचाकी घरासमोरील पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना इंदिरानगर परिसरात घडली. येथील सचिन सुरेश पाटील (विठ्ठल सोसायटी, इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची एमएच १५, एवाय ३८९० या क्रमांकांची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तिसरी घटना आडगाव परिसरात घडली. येथील निळकंंठ दत्ताराव सानप (रा. दत्तनगर आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरूवारी रात्री त्यांच्या इमारतीतून चोरट्यांनी त्यांची एमएच १५, डीआर ४४५० या क्रमांकाची दुचाकी तसेच पाण्याची मोटार चोरून नेली या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वाहन चोरीच्या प्रकारांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या