गिरीश टकले यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
Featured

गिरीश टकले यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

इतिहासकार गिरीश टकले लिखित ‘सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई? आणि शिवछत्रपतींची अखेरची (जालनापूर) मोहीम’ या पुस्तकाचे रविवारी (दि.१९) शिक्षणतज्ञ व पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वि. प्र. गुप्ते यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण नाशिक आणि मराठी देशा फाऊंडेशन यांच्यातर्फे शरणपूररोड येथील वैराज कलादालनात सायंकाळी ५.३० वाजता प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दुर्गतज्ञ आणि प्रसिद्ध लेखक भगवान चिले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये सुरत लुटीला विशेष महत्त्व आहे. इतिहासातील या महत्त्वपूर्ण घटनेवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत.

मात्र, टकले यांनी सुरत लुटीची मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी करण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. हे पुस्तक इतिहासप्रेमी तसेच अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकते. या प्रकाशन सोहळ्यास इतिेहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com