सटाणा तालुक्यात मोठे साकोडेतील युवकाची आत्महत्या
Featured

सटाणा तालुक्यात मोठे साकोडेतील युवकाची आत्महत्या

Abhay Puntambekar

डांगसौंदाणे । प्रतिनिधी

बागलाण च्या पश्चिम भागातील  मोठे  साकोडे गावातील रविंद्र (महादु) यशवंत साबळे (१८ ) या तरुणाने साकोडे येथील गट नंबर ७८ मधील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली .

याबाबत पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी सटाणा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई पोलीस हवालदार प्रकाश जाधव जयंतसिंग सोळंके राहुल शिरसाठ, आदिनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .

नंतर मृतदेह डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्नालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला . सदर घटनेची सटाणा पोलिसांत आकस्मिकमृत्यु ची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com