सटाणा : मका खरेदी केंद्राचा शुभारंभ
Featured

सटाणा : मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

Abhay Puntambekar

सटाणा । प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने किमान आधारभुत किमंत खरेदी अंतर्गत मका खरेदी-विक्रीचा शुभारंभ येथील सटाणा दक्षिणभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी अंतर्गत राज्य . वखार महामंडळाच्या आवारात बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्य शाासनाच्या पणन हंगामाच्या वतीने किमान आधारभुत किंमत खरेदी अंतर्गत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ सटाणा दक्षिण भाग सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सन २०१९-२० रब्बी हंगामासाठी आधारभुत दर निश्‍चित करण्यात आला असून प्रति क्विटंल १७६० रूपये इतका निश्‍चित करण्यात आला आहे.

यासाठी शेतकर्‍यांनी सटाणा सोसायटी कार्यालयात सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक देऊन आवश्यक करण्यात आले आहे. मका खरेदीसाठी एकरी मर्यादा १२ क्विटंल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मनोहर देवरे यांनी दिली.

मका खरेदी शुभारंभाप्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहाय्यक निबंधक महेश भंडागे, व्हा.चेअरमन द्वारकाबाई सोनवणे,कृउबाचे माजी सभापती भिका सोनवणे, दक्षिणचे संचालक दौलत सोनवणे, आप्पा नंदाळे, राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, पांडूरंग सोनवणे, सचिव सुनिल देवरे, कृउबाचे सचिव भास्कर तांबे,प्रदिप सोनवणे, गौरव सोनवणे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com