उद्योग क्षेत्रात सुरक्षिततेचा जागर; अपघात शुन्यावर आणण्याचा संकल्प
Featured

उद्योग क्षेत्रात सुरक्षिततेचा जागर; अपघात शुन्यावर आणण्याचा संकल्प

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्रातील अपघात शुन्यावर आणण्याच्या संकल्पासह विविध उपाय योजनांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याची शपथ बहुतांश उद्योगानी गेतली. काही कारखान्यांत सूरक्षिततेवर आधारित प्रात्यक्षिक दाखविण्यात आली.या सप्ताचा शुभारंभ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाचे सहसंचालक देविदास गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिक औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखान्यात सुरक्षा व उत्पादकता यावर प्रबोधन करण्यात आले. अनेक कारखान्यात कार्यरत असलेल्या औद्योगिक सूरक्षा विभागातर्फे ध्वजारोहण करुन सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.

सिन्नर येथील बहुतांश उद्योगांनी सूरक्षिततेचाजागर केला. अनेक उद्योगांच्या आवारात सूरक्षिततेच्या सूचना फलक लावुन प्रबोधन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने भगवती स्टिल उद्योगात संचालक अजय बहेती यांच्या पूढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री बहेती यांनी कामगारांना सुरक्षिततेचे महत्व सांगून काही थोड्या काळजीद्वारे आपण मोठी दुर्घटना टाळू शकत असल्याने प्रत्येकाने याबाबत जागरुकता बाळगण्याचे आवाहन केले.तसेच सिन्नरच्या ओके फर्न प्रिसीजन कास्टिंग प्रा. लि या उद्योगाने सर्व कामगारांना सरक्षिततेची शपथ देत त्याचे महत्व पटवून सांगितले. व सुरक्षिततेच्या साधनांच्या वापराचा आग्रह धरला.

पॉलीजीन्टा कारखान्यातही सूरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. याठिकाणी औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक डी.आर.खिरोडकर यांनी आपल्या अनुभवांंचे दाखले देत सुरक्षिततेचे महत्व कथन करुन उद्योग क्षेत्रातील अपघात हे शुन्यावर आणण्यासाठी सर्वांच्या सामुदायीक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com