Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिफाडला सकाळपासून पावसाची हजेरी

निफाडला सकाळपासून पावसाची हजेरी

शेतकऱ्यांचा ताडपत्री, प्लास्टिक कागद खरेदीवर भर

निफाड । प्रतिनिधी

- Advertisement -

निफाड तालुक्यात आज सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे ,पावसामुळे शेतकऱ्यांनी ताडपत्री प्लास्टिक, कागद ,शेडनेस ,पत्रे ,ऑगल, बियाणे ,खते खरेदीसाठी तालुक्याच्या बाजारपेठेत गर्दी केली होती,आज दिवसभर तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही,चक्री वादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन निफाड नगरपचायतीने दुपारी 2 वाजेतर शहरातील सर्व दुकाने बंद केली.

आज दिवसभर शहरासह ग्रामीण भागात चक्री वादळाचीच चर्चा सुरु होती ,खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक आज दिवसभर घराची डागडुजी ,छप्पर दुरुस्ती, शेतमाल झाकण्याची लगबग दिसून आली,अनेकांनी टीव्ही जवळ बसून बातम्या बघणे पसंत केले,दुपारनंतर बाजारपेठेत सुनसान वातावरण दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या