Sunday, May 5, 2024
Homeनाशिकऑनलाइन शिक्षण पद्धत सुरु केल्यास पेठ तालुक्यात समस्यांचा डोंगर

ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरु केल्यास पेठ तालुक्यात समस्यांचा डोंगर

 शाळा सुरु करण्याबाबत नागरिकांचा कल 

कोहोर | वार्ताहर

- Advertisement -

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण व्यवस्थाच संकटात आहे. करोनाच्या आजारामुळे ऐन वर्षाअखेर परीक्षाही घेण्याचे टाळले गेले. आज अखेर अडीच महिन्याहून शाळा बंद आहेत. तसेच पेठ तालुक्यात सध्या तरी कोरोना संसर्गजन्य आजाराची परिस्थिती नाही. त्यामुळे दि.१५ जून रोजी शाळा सुरु करण्यात बाबत व न करण्याबाबत अनेक नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

शाळा सुरु केल्या तर करोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती शासन व पालकांना आहे. अशा परिस्थितीत डिजिटल शिक्षणाचा पर्याय पुढे येत असला तरी पेठ तालुक्यात शासनापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत अडथळ्यांचा डोंगर पार करावा लागणार आहे. पेठ तालुका बहुतांश भाग दुर्गम व डोंगराळ आहे. अनेक शाळांमध्ये आजही विजेची समस्या आहे. त्यामुळे संगणक असूनही इंटरनेटसारख्या सुविधा तर दूरचीच बाब आहे. अशा स्थितीत आँनलाईन शिक्षणाचा पेच निर्माण होण्याची शक्यता असून नेहमीप्रमाणे शाळा सुरु झाल्यास अनेक मुद्यांचा गुंता सुटणार आहे.

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची गरज

सध्या पेठ तालुक्यातीत करोनासदृश परिस्थिती नाही. तसेच करोनाचा पेशंट नसल्यामुळे शाळा सुरु केल्या पहिजेत. परंतु, शाळा सुरु करण्याआधी नाशिक शहरातून येऊन – जाऊन करणारे शिक्षक पेठ तालुक्यातील स्थायिक राहायला हवे. जेणेकरून कोरोनो आपल्या तालुक्यात येणार नाही.
— गणेश गवळी, युवा अध्यक्ष
(अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,)

सध्याची परिस्थिती बघून शाळा सुरु करावी

सध्याची परिस्थिती बघता प्रशासनाने अजुन थोडे दिवस थांबून राज्यातील करोनाची परिस्थिती बघून शाळा चालू करण्याबाबत निर्णय घ्यावा. कारण, करोना ग्रामीण भागात पसरला तर अपुऱ्या वैद्यकीय सुवीधांमुळे कंट्रोल करणे अवघड होईल.
-विशाल जाधव, अध्यक्ष
तालुका काँग्रेस अध्यक्ष

दोन शिफ्टमध्ये शाळा भरवाव्यात

पेठ तालुक्यात आँनलाईन शिक्षण देणे शक्यच नाही. जिथे फोनलाच रेंज नाही. अशा ठिकाणी आँनलाईन शिक्षण हास्यस्पद ठरेल. शाळा सुरु केल्या तर एका वर्गात चाळीस विद्यार्थी असतील तर वीस -वीस प्रमाणे विद्यार्थ्यांची बँच करुन दिवसांतून दोन वेळा शिफ्टचे आयोजन करावे. जेणेकरुन एक मीटर अंतरावर मुलांना बसविणे संरक्षित होईल. तसेच वर्गात सर्वांनी तोंडाला मास्क लावावे.
–हेमराज जाधव(ग्रामस्थ) दोनवाडे ता.पेठ

शाळा समितीची बैठक घेणार
शाळा सुरु झाल्याच तर या अगोदर शाळा समिती व्यवस्थापन आणि ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामस्थांकडून उपाययोजनाबाबत आढावा घेवू. त्यांनतर शाळेला ग्रामपंचायतकडून संरक्षित साहित्याचा पुरवठा करु.
— सुरेश जाधव सरपंच, दोनवाडे

- Advertisment -

ताज्या बातम्या