पेठ : जमीन मशागतीच्या कामांना वेग; पेरणीबाबत शेतकरी संभ्रमात
Featured

पेठ : जमीन मशागतीच्या कामांना वेग; पेरणीबाबत शेतकरी संभ्रमात

Abhay Puntambekar

गतआठवड्यापासून कधी ऊन तर कधी पाऊस

कोहोर | वार्ताहर

पेठ तालुक्यात निसर्ग वादळानंतर कोहोरसह जोगमोडी व करंजाळी परिसरात झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी खरीप पेरणी पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतकऱ्यांची शेतात पेरणीची लगबग सुरु आहे. परंतु वादळानंतर परिसरात कधी तीव्र ऊन तर कधी अचानक पाऊस पडत असल्याने परिसरातील शेतकरी खरीप पेरणीबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

दरवर्षी शेतकरी बी-बियांणे व खते बाजारातून विकत घेत असतो. तसेच काहींनी वातावरणाची परिस्थिती, बाजारभाव, यामुळे भविष्यात पीक उत्पानाची शाश्वती नसल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी घरगुती म्हणजेच यापूर्वी शेतात पिकविलेल्या बियाणांचाच वापर करण्यास पंसती दिली आहे.

तालुक्यात मागील आठवड्यात निसर्ग वादळीचा पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पाऊस अधून-मधून पडत असल्याने व सदृश्य परिस्थितीमुळे परिसरातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे.

कोहोर, दोनवाडे व करंजाळी परीसरात दिवसा-आड सांयकाळी पाऊस पडत असल्याने, परि सरातील शेतकरी खरीपाच्या पेरणीबाबत संभ्रमात आहे. पाऊस नियमित पडेल म्हणून परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांने धूळ वाफेवर पेरणी केली आहे. त्यामध्ये भातासह नाचणीचाही समावेश आहे. तसेच पेरणीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे व खते यांच्या जुळवाजुळवीसाठीही बळीराजाची लगबग परीसरात पहावयास मिळत आहे.

मागील वर्षी परीसरातील शेतकऱ्यांने पिकविलेल्या धान्याचे बियांणे राखून ठेवले होते. मात्र, सध्या बाजारात बियाणांची किमंती वाढली असून शेतकऱ्यांने राखीव ठेवलेले बियांणे शेतीसाठी बाहेर काढावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी घरगुती बियाणाला पंसती देत आहे. यंदा सर्वत्र हेच चित्र दिसत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com