नाशिक सायकलिस्ट्सची पंढरपूर सायकल वारी रद्द
Featured

नाशिक सायकलिस्ट्सची पंढरपूर सायकल वारी रद्द

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशन तर्फे मागील आठ वर्षां पासून नाशिक ते पंढरपूर सायकल वारी हा उपक्रम अत्यंत स्तुत्यपणे पार पाडत आहे. विशेष बाब म्हणजे नाशिककरांचे आणि नाशिक ते पंढरपूर यादरम्यानच्या सर्व भाविकांचं नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनच्या सायकल वारीला ८ वर्षांपासून भरभरून प्रेम मिळत आहे.

या सायकल वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आमच्या टीमसाठी आणि मायबाप नागरिकांसाठी या निवेदनाद्वारे यंदाचे ९ वे वर्ष नाशिक-पंढरपूर सायकल वारी जगभरातील करोनाच्या संकटामुळे रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे असे नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com