मनपाने गाळेधारकांचे चार महिन्याचे भाडे माफ करावे – सलीम शेख

मनपाने गाळेधारकांचे चार महिन्याचे भाडे माफ करावे – सलीम शेख

सातपूर । प्रतिनिधी

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना नाशिक मनपाच्या काढलेल्या आदेशा नुसार व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. २१ मार्च पासून मनपा हद्दीतील मार्केट व गाळेधारकांचे व्यवसाय बंद पडलेले असल्याने प्रशासनाने चार महिन्याचे भाडे वसूल करू नये अशी मागणी गाळेधारकांच्या वतीने माजी सभागृहनेते व नगरसेवक सलीम शेख यांनी केली आहे.

कोविड चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्व बाजारपेठा बंद करण्याचे निर्देश दिले या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ही ही त्यांच्या अखत्यारीतील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स व भाजीबाजार मंडई, बाजारपेठा बंद केल्या २१ मार्च पासून व्यवसाय ठप्प असल्याने व्यापारीवर्ग हतबल झाले आहे प्रशासनाने नुकतेच सर्व बाजार खुली केली असली तरीही सम-विषम नियमामुळे व्यवसायांवर विपरीत परिणाम झालेला आहे त्यामुळे २१ मार्च पासून सलग चार महिने मनपा प्रशासनाने गाळे भाडे आकारून नये अशी मागणी माजी सभागृहनेते व नगरसेवक सलीम शेख यांनी गाळेधारक व्यवसायिक व संघटनांच्या वतीने मनपा प्रशासनाला केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com