निमाच्या विविध स्तरावरील पाठपुराव्याला यश
Featured

निमाच्या विविध स्तरावरील पाठपुराव्याला यश

Abhay Puntambekar

मनुष्यबळ कमतरते विषयी एमआयडीसीची ऑनलाईन नोंदणी

सातपूर । प्रतिनिधी

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान उद्योग पूर्ववत सुरू व्हावे यासाठी निमातर्फे विविध स्तरावर प्रयत्न झाले. आता अशा सुरु झालेल्या उद्योगांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी निमा पदाधिकारी विविध स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात कामगार व मजुरांचे जिल्ह्यातून स्थलांतर झाल्यानंतर बऱ्याच उद्योगांनी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे निमा स कळविले. निमातर्फे ही बाब म. औ. वि. महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्याकडे मांडण्यात आली व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यास अनुसरून म. औ. वि. महामंडळातर्फे ‘औद्योगिक मनुष्यबळ सर्वेक्षण २०२०’ या ऑनलाईन सर्व्हेची सुरुवात करण्यात आली आहे.

http://permission.midcindia.org/ या लिंक वर सदर सर्वेक्षणाचा ऑनलाईन फॉर्म उपलब्ध असून त्यात कंपनीचे नाव, प्रक्रियेचे स्वरूप, कंपनीची श्रेणी, कंपनीचा प्रकार उदा.मोठा उद्योग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आदी कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव, लॉकडाऊनच्या आधी, सद्यस्थितीत व आवश्यकता असलेले कुशल व अकुशल तसेच कॉन्ट्रॅक्ट व कायमस्वरूपी मनुष्यबळ, ट्रेंडनुसार कामगारांची आवश्यकता इ. बाबी नमूद करावयाच्या आहेत.

सदर फॉर्म भरण्याची मुदत १० जून पर्यंत आहे. ज्या उद्योगांना मन्युष्यबळाची कमतरता भासत असेल अशा उद्योगांनी सदर लिंकवर जाऊन आपली आवश्यकता नोंदवावी असे आवाहन निमा निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, किरण पाटील व सुधाकर देशमुख, कैलास आहेर यांनी केले आहे.

निमातर्फे लॉकडाऊन सुरु झाल्यापासूनच औद्योगिक क्षेत्रात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी निमातर्फे स्वतंत्र मदत कक्ष देखील सुरु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com