Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिसर्ग चक्री वादळात औद्योगिक क्षेत्र सुरक्षित; मात्र काही ठिकाणी साचले पाणी

निसर्ग चक्री वादळात औद्योगिक क्षेत्र सुरक्षित; मात्र काही ठिकाणी साचले पाणी

सातपूर । प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा राज्याला बसणार असल्या वृत्त शासनाने दिल्यानंतर उद्योगक्षेत्राला त्याचा फटका बसू नये तसेच कामगार सुरक्षित घरी राहावे या उद्देशाने उद्योजक संघटनांनी दुपारची शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे दुपारनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसात सोसाट्याच्या वार्‍यात उद्योगक्षेत्र सुरक्षित राहील्याचे चित्र होते.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले उद्योगक्षेत्रात कामगारांना त्याचा फटका बसू नये म्हणून उद्योजक संघटनांनी दुसऱ्या शिफ्ट चे काम बंद ठेवले यासोबतच विज पुरवठा अनियमीत राहण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्युत सयंत्राची काळजी घेण्याच्या दृष्टीने सूचनाही उद्योजकांना देण्यात आल्या होत्या . त्यामुळे उद्योगक्षेत्राला या वादळाच्या फारसा फटका बसला नसल्याचे आयमा अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले.

मात्र दरवर्षी पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणांवर उपाययोजना केलेली नसल्याने त्या उद्योगक्षेत्रातील ठराविक कारखान्यांच्या परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याचे चित्र होते.

उद्योगांसह कामगारांची सुरक्षितता महत्वाची

महाभयंकर चक्रीवादळात काहीही गंभीर परिणाम होऊ शकतो यात उद्योग वाचवताना कामगारही सुरक्षित राहिला पाहिजे या उद्देशाने अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांना दुसऱ्या शिफ्टचे काम बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली होती त्यानुसार ७० टक्के उद्योगांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
वरून तलवार अध्यक्ष आयमा

सातपूर परिसरात उन्मळून पडले १६ झाडे

सातपूर विभागातील वेगवेगळ्या भागांमध्ये तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यांची कोंडी झाली होती सातपूर अग्निशमन दलाला पाचारण करून मार्ग मोकळा करण्याचे काम आजही युद्धपातळीवर सुरू आहे या कामी अग्निशमन पथकाचे लीडिंग फायरमन सी एम अवसरकर,सी व्ही दोंदे, पि बी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या