दिंडोरी : कोशिंबे शिवारात वृध्दावर बिबट्याचा हल्ला
Featured

दिंडोरी : कोशिंबे शिवारात वृध्दावर बिबट्याचा हल्ला

Abhay Puntambekar

चौसाळे | प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथिल शेतकरी गोविंद बापू चौधरी वय ७५ वर्ष यांच्या छाती व पाठ दुःख असल्याने ते कोशिंबे येथील खाजगी दवाखान्यात त्यांचा नातु देविदास मधुकर राऊत हे घेऊन गेले, तेथे उपचार झाल्यावर कोशिंबे टाक्याचापाडा मार्गी हस्तेदुमाला येथे मोटार सायकल वर जात असतांना कोशिंबे ते टाक्याचापाडा रस्त्यात अचानक बिबट्याने हल्ला केला.

बिबट्याच्या  हल्ल्यात गोविंद चौधरी यांच्या डाव्या हातावर पंजा मारल्या ने खोल जखम झाली . त्यात देविदास राऊत हे मोटारसायकल चालवित असतांना गाडीवर हल्ला केल्याने गाडी रस्त्यावर पडली. समोरुन टाक्याचापाडा कडुन एक मोटारसायकल आल्या ने बिबट्या जंगलाच्या दिशेने पळुन गेला. समोरुन मोटार सायकल आल्या ने नातु व आजोबांचे जीव वाचले.

जखमी गोविंद चौधरी यांना तात्काळ वणी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन उपचार केले. गोविंद चौधरी यांचे मुळ गाव पिंप्रीअंचला येथिल असुन ते आपल्या मुलीकडे हस्तेदुमाला येथे राहतात. वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांना कडुन होत आहे तिन आठवड्या पुर्वी चौसाळे येथिल वृद्ध महिलेवर देखील असाच हल्ला झाला होता. त्या मुळे हस्तेदुमाला, टाक्याचापाडा, चौसाळे परिसरात बिबट्याच्या हल्ला मुळे भितीचे वातावरण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com