दोन फरार गुन्हेगार इंदिरानगर पोलीसांच्या ताब्यात
Featured

दोन फरार गुन्हेगार इंदिरानगर पोलीसांच्या ताब्यात

Abhay Puntambekar

इंदिरानगर । वार्ताहर

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील विविध गुन्ह्यात गेल्या तीन वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार व एक वर्षापासून तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा दोघांना इंदिरानगर पोलीसांनी शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होते.

मागील तीन वर्षापासून फरार असलेला संशयित आरोपी समीर निजामुद्दीन शेख उर्फ सोनू कट्टा (२९ मल्हार कॉलनी वडाळा गाव ); व मागील एक वर्षापासून तडीपार असलेला शौकत सुपडू शहा असे अटक करण्यात आलेले संशयित आरोपींची नावे आहेत .

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सोनू कट्टा रविवार (दि ७) रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास गावात येणार असल्याची त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बोंडे यांना माहिती कळवली.

तातडीने बोंडे, जाकीर शेख ,अमोल सोनार, राजेश निकम,भाऊराव गवळी, मुशरिफ शेख,यांनी वडाळागाव चौफुलीवर सापळा रचला चार वाजेच्या सुमारास सोनू कट्ट्या आला असता त्याने पोलीसांना पाहून पळ काढला परंतु पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली . तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शहाला देखील अटक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी दिली आहे .

Deshdoot
www.deshdoot.com