इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने शिक्षण विभागाचे अभिनंदन
Featured

इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने शिक्षण विभागाचे अभिनंदन

Abhay Puntambekar

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव सर्व शिक्षकांनी पूर्तता करून दिलेले असतांनाही इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी पासून वंचित राहावे लागले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने नुकतेच जिल्ह्यातील शिक्षकांचे चटोपाध्याय व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर केले असून इगतपुरी तालुक्याचे प्रस्तावच पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेला न पाठवल्यामुळे इगतपुरी तालुक्याचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही.

सदर प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही तालुका शिक्षण विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने आज रोजी पर्यंत प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे गांधीगिरी करत इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण विभागाला गुलाबपुष्प आणि अभिनंदन पत्र देऊन उपहासात्मक सत्कार करण्यात आला.

गटविकास अधिकारी किरण जाधव साहेब यांनी शिक्षण विभागाबद्दल नाराजी व्यक्त करून यास जबाबदार कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून आजच सर्व प्रस्ताव जिल्हापरिषदेला तातडीने पाठविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. इगतपुरी तालुका शिक्षक संघाचे नेते उमेश बैरागी तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, दीपक भदाणे, सुनील शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com