Friday, April 26, 2024
Homeनाशिकघोटी : आज एका ४५ वर्षीय व्यक्तीस करोनाची बाधा

घोटी : आज एका ४५ वर्षीय व्यक्तीस करोनाची बाधा

घोटी । जाकीरशेख

इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील एका ४५ वर्षीय इसमास करोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. गेल्या महिनाभरापासून या इसमास घशाचा त्रास जाणवत होता . दरम्यान या घटनेमुळे घोटी शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून तालुक्यातील नागरिकांनी गांभीर्य लक्षात घेऊन दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या आहे खबरदारी चा उपाय व दक्षता म्हणून बाधित इसम राहत असलेला परिसर सील केला आहे.

- Advertisement -

दरम्यान आज स्थितीत घोटी शहरात करोनाबाधित रुग्ण संख्या दोन झाली असून इगतपुरी तालुक्यात ऐकून बारा रुग्ण नोंद झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्र तथा तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी दिली. आज दुपारी घोटीत करोना बाधित रुग्ण असल्याची माहिती मिळताच तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे , प्रभारी सरपंच संजय आरोटे यांनी श्रीरामवाडी परिसरात भेट देऊन आढावा घेतला.

दरम्यान घोटी शहरातील वर्दळीचे ठिकाण तसेच विशेष म्हणजे घोटीचे प्रभारी सरपंच संजय आरोटे यांचा बालेकिल्ला असलेल्या रामवाडी परिसरातील बांगरगल्ली या ठिकाणी एका ४५ वर्षीय इसमास ही करोनाची बाधा झाल्याने या परिसरात नागरिकांनी धसका घेतला आहे . प्रशासनाने दखल घेत या रुग्णाच्या कुटुंबातील संपर्कातील अन्य तीन हायरिस्क सदस्यांना इगतपुरी येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून अन्य संपर्कात आलेल्या जवळपास १५ लोकांना होम कोरोटाईन करण्यात आले आहे.

घोटी पोलिसांनी हा परिसर तात्काळ सील केला असून ग्रामपालिकेनेही या परिसरात जंतुनाशक फवारणी सुरू केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या