Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकघोटी : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

घोटी : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र स्पष्ट होत असतांनाच तालूका आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातील इतर सर्व रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहर वाशीयांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. शनिवारी ( दि. २३ ) दरम्यान प्राथमिक आरोग्य कर्मचारी ह्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच घोटीत आठवडाभर सर्व व्यवहार बंद करत शहरात कडेकोट स्वयंपूर्तीने बंद पुकारला होता.

- Advertisement -

दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी बी.जी. देशमुख यांच्या माहितीनुसार आरोग्य कर्मचारी यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्य व एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर यांचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची आनंदाची माहिती त्यांनी दिली.

ग्रामीण अदिवासी भागातील घोटी शहर हे महत्वपूर्ण शहर मानले जाते, बाजारपेठ असल्याने चार जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांसाठी येत-जात असल्याकारणाने शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे संपूर्ण शहर व शहरातील गल्ली व वस्त्यांचे रस्ते नागरिकांनी स्वयंपूर्तीने बंद केले होते. मात्र नागरिकांनी काळजी घेत घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या