१७ हजारांचा गुटखा जप्त ; गुन्हे शाखा १ ची कामगिरी
Featured

१७ हजारांचा गुटखा जप्त ; गुन्हे शाखा १ ची कामगिरी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

उपनगरच्या कॅनॉलरोड परिसराील इंदिरानगर झोपडपट्टी येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून नाशिक पोलीसांनी १७ हजार रूपयांचा गुटखा तसेच सुंगंधी तंबाखुजन्य पदार्थाचा साठा रविवारी (दि.३१) सायंकाळी जप्त केला. ही कामगिरी गुन्हे शाखा 1 च्या पथकाने पार पाडली.

बबलु गुलामनबी शेख (२८, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, कॅनॉलरोड, उपनगर) असे या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहेे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध व्यवसाय करणारांवर शहर पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान रविवारी सायंकाळी इंदिरानगर झोपडपट्टीत संशयित बंदी असलेले तंबाखुजन्य पदार्थांचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समिर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने इरफाण किराणा या दुकानात छापा मारला. यावेळी त्यांच्या ताब्यात हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखु, राजनिवास सुगंधी पानमसाला, एन.पी.१ जाफरारी जर्दा, व्ही १ तंबाखु, विमल पानमसाला असा १७ हजार २४५ रूपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सचिन खैरनार, उपनिरिक्षक बलराम पालकर, कर्मचारी रविंद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे, दिलीप मोंढे, समाधान पवार यांनी पार पाडली.

Deshdoot
www.deshdoot.com