Friday, April 26, 2024
Homeनाशिकसॅमसोनाईट कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निदर्शने

सॅमसोनाईट कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निदर्शने

घोटी । जाकीरशेख

लॉकडाऊन काळात कामगारांना पूर्ण वेतन द्या असे केंद्र व राज्य सरकारचे आदेश असतानाही इगतपुरी तालुक्यातील सॅमसोनाईट कंपनीने कामगारांना पूर्ण वेतन न देता वेतन थकीत केले. त्यामुळे कामगारांना थकीत वेतन अदा करा ही मागणी करत याबाबत कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साठी सिटू युनियनच्या नेतृत्वाखाली असंख्य कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत निदर्शने केली.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा ली या कंपनीने लॉकडाऊन काळातील पूर्ण वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन काळात कंपनी प्रशासनाने कामगारांचे कोणतेही वेतन कपात न करता पूर्ण वेतन देण्याबाबत आदेश निर्गमित केले असतानाही कंपनीने कामगारांना पूर्ण वेतन न दिल्याने कामगार वर्गात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत पूर्ण वेतन देण्याची मागणीही करण्यात आली. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर सॅमसोनाईट कंपनीच्या प्रवेशद्वारावर सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करीत तसेच सहभागी कामगारांनी तोंडाला मास्क लावत निदर्शने व घोषणाबाजी केली. या निदर्शनाचे नेतृत्व सिटू युनियनने केले. या निदर्शन आंदोलनात सिटू युनियनचे जिल्हा सेक्रेटरी काँ देविदास आडोळे, युनियन प्रतिनिधी निलेश तिदमे, रमेश परदेशी, विजय जाधव, मधुकर खंडागळे, राजेंद्र सोनवणे, सोमनाथ नाठे, मंगेश नलावडे, आदींनी सहभागी होऊन नेतृत्व करीत कामगारांना थकीत वेतन अदा करण्याची मागणी केली. यावेळी असंख्य कामगार सहभागी झाले होते.

इगतपुरी तालुक्यातील सॅमसोनाईट या कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून कामगार काम करीत आहे मात्र लॉकडाऊन च्या काळात सुरुवातीला कामगारांना पूर्ण वेतन दिले मात्र नंतरच्या काळात कामगारांच्या वेतनात कपात करण्यात आली, लॉकडाऊन मुळे कंपनीचे काम व उत्पादन बंद असल्याच्या कारणावरून कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली त्यामुळे कामगारांना थकीत व कपात केलेले पूर्ण वेतन मिळावे तसेच सध्या काही अंशी सुरू असलेल्या कामात या कामगारांना सहभागी करून घ्या, अशी मागणी करण्यात आली
कॉ. देविदास आडोळे – जिल्हा सेक्रेटरी, सिटू युनियन

- Advertisment -

ताज्या बातम्या