Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील कर्मचाऱ्यांची आदिवासी बांधवांना मदत

नाशिक औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील कर्मचाऱ्यांची आदिवासी बांधवांना मदत

नाशिक । प्रतिनिधी

महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील बॉयलर मेंटेनन्स विभागातीळ कर्मचारी यांनी दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी वस्तीमध्ये दैनंदिन किराणा,लहान मुलांना बिस्किट्स आणि कपडे वाटप करत आपलाही मदतीचा हात दिला.

- Advertisement -

स्वतःच्या मालकीची हक्काची जमीनही नसलेल्या आणि केवळ दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांची लॉकडाऊनमुळे अत्यंत बिकट अवस्था झाली आहे त्यातच करोनाची निर्माण झालेली भीती यामुळे अत्यंत अस्वस्थ असलेल्या या बांधवाना सरकारी मदतीबरोबरच आपणही पुढाकार घेत मदत करून धीर दिला पाहिजे या भावनेतून औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधील बॉयलर मेंटेनन्स विभागाने विभाग प्रमुख मा. अतुल सोनजे यांच्या पुढाकाराने चाफ्याचा पाडा , धाब्याचा पाडा , मांगोने या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते नंदू गवळी यांच्या साहाय्य्यने भेट देत साहित्य सुपूर्द केले .

त्याचवेळी ग्रामस्थांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले व त्यांना धीर दिला . या उपक्रमासाठी नाशिक औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता आव्हाड यांनी प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले. महानिर्मितीच्या या कर्मचाऱ्यानी आपली सेवा बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या