Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदेवळा पंचायत समितीकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामपंचायतीचा आढावा

देवळा पंचायत समितीकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामपंचायतीचा आढावा

वाजगाव । शुभानंद देवरे

देवळा पंचायत समितीकडून प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामपंचायत विभागाचा विविध कामाचा आढावा येथील गटविकास अधिकारी देशमुख यांनी आला. कोरोनाचा संपूर्ण देशभरात प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन ३ व संचारबंदी लागू असल्याने शासनामार्फत कोणत्याही प्रकारचा आढावा बैठकीसाठी अधिकारी, कर्मचारी यांना एकत्रितपणे न बोलवता लॉकडाऊनचे पालन होण्यासाठी सर्वत्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्याचा मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्याने देवळा पंचायत समितीमार्फत येथील गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत विभागाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

यावेळी तालीक्यातील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामविकास विभागांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत कृती आराखड्यातील समाविष्ट कामे, घरकुल, वैयक्तिक लाभांतर्गत विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, वार्षिक अहवाल, सन २०२०-२१ ची करमागणी, संगणक परिचालक यांचे दरडोईचे ऑनलाईन कामे आदीचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय रोजगार हमी योजनेचे कामाचे देखभाल करणारा ग्रामरोजगार सेवक यांचे कामे व त्यांना मिळणारा कामाचा मोबदला याविषयी संविस्त आढावा घेण्यात आला.

देवळा पंचायत समितीमार्फत तालुक्यातील ग्रामपंचायतीचा प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यासाठी तुषार थोरात तालुका समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केल्याने थोरात यांचे उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षांव करण्यात आला. व यापुढेही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी देशमुख यांनी दिली.

यावेळी देशमुख गटविकास अधिकारी, जयवंत भामरे विस्तार अधिकारी (ग्रा.पं), सुनिक पगार विस्तार अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी भुपेंद्र पाटील, वरिष्ठ सहाय्यक शामकात साळुंखे, सी.डी.ओ भरत चव्हाण, ललित गुंजाळ आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या