Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदेवळा कृषी विभागामार्फत ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते’ उपक्रमाचा शुभारंभ

देवळा कृषी विभागामार्फत ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते’ उपक्रमाचा शुभारंभ

नोंदणीकृत गटामार्फत थेट खते व बियाण्याचा पुरवठा

वाजगाव । शुभानंद देवरे

- Advertisement -

सध्या  काही दिवसापासून संपूर्ण देशावर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची खते व बियाने खरेदीसाठी गर्दी होऊ नये, यासाठी ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते’ ह्या उपक्रमांतर्गत तालुक्यातील गटांची नोंदणी करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खते देण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

देवळा तालुक्यातील मटाने येथे आज (दि.८) रोजी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते’ या उपक्रमांचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासन निदेशानुसार उपस्थितांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले.

पेरणीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात खते व बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असुन, शेतकऱ्यांची पिकांची लागवड सुरू होण्यापूर्वीच तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक खते व बियाणे नोदनिकृत गटामार्फत पुरविण्यात येणार असून तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत बी बियाणे, रासायनिक खते यांची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खते, बी बियाणे खरेदी करावी. याचबरोबर माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांचा वापर करण्याचे आवाहन देवळा तालुका कृषी अधिकारी देवरे यांनी केले.

यावेळी मटाने गावाचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, मंडळकृषी अधिकारी शांताराम भोये, विजय जाधव, खंडू आहेर, कंदम, कृषी सहायक .मनिषा जाधव, कृषी मित्र तथा ग्रा,पं.सदस्य समाधान केदारे आदि उपस्थित होते.

करोना’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभागामार्फत ‘शेतकऱ्यांच्या बांधावर खते’ या उपक्रमामुळे शेतकरी गटामार्फत खते व बियाणे शेतकऱ्यांच्या त्यांच्या बांधावर मिळणार यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक खते व बियाणे मुबलकप्रमाणत वेळेवर मिळणार याशिवाय लॉकडाऊनचे पालन करत दुकानांमध्ये होणारी गर्दी व एक मेकांपासून संसर्ग रोखण्यास मदत होईल. कैलास खैरनार उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण

- Advertisment -

ताज्या बातम्या