पेठ : बायपास रस्त्यासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर- खा.डॉ.भारती पवार
Featured

पेठ : बायपास रस्त्यासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर- खा.डॉ.भारती पवार

Abhay Puntambekar

जानोरी । वार्ताहर

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पेठ शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८४८ वर पेठ शहराच्या बाहेरून बायपाससाठी ८५.०६ कोटींच्या कामास खा.डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडून मंजुरी मिळाली असून रू.३३.५ कोटी इतके भूसंपादनासाठी मजूर करण्यात आले आहे. तर ५१.५२ कोटी हे प्रत्यक्ष कामासाठी मंजूर झाले आहे.

सदर बायपासच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. या बायपास मूळे पेठ शहरात सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीतून सुटका होणार आहे. राष्ट्रीय मार्ग ८४८ वरून होणारी ही पेठ शहरातून होत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अनेक रस्ता क्रॉसिंग च्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे . यामुळे अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

या सर्व समस्या विचारात घेता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून अखेर पेठ बायापासच्या कामास हिरवा कंदील मिळाला असून लवकरच जागेवर काम सुरू होणार आहे अशी माहिती खा.डॉ.भारती पवार यांनी दिली. तसेच सदर कामास तातडीने मंजुरी दिल्या बद्दल खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com