६५ वी शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धा; महाराष्ट्रचा संघ जाहीर
Featured

६५ वी शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धा; महाराष्ट्रचा संघ जाहीर

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

जम्मू येथे दिनांक ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ६५ वी मुलांच्या शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर विभागीय क्रीड़ा संकुल, पंचवटी येथे आयोजीत केले होते. या संघाच्या कर्णधार पदी नाशिकचा वीर अभिमन्यु पुरस्कार प्राप्त दिलीप खांडवी याची निवड करण्यात आली आहे. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक परभणीचे शासकीय क्रीड़ा मार्गदर्शक संजय मुंडे असून व्यवस्थापक नाशिकचे कांतीलाल महाले आहेत.

राज्य संघ पुढीलप्रमाणे.कर्णधार दिलीप खांडवीवनराज जाधव , जयदीप देसाई , शिवराम शिंगाडे , आशुतोष पवार , रोहन कोरे , रुपेश जाधव , अनिकेत जाधव , मुज्जफर पठाण , शनीराजे हरगे , विशाल डुकरे , रोहित भायजी .

या संघाला नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी शुभेच्छा देतांना राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व आहे व हा तुम्ही या स्पर्धेत विजयी व्हाल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला .

Deshdoot
www.deshdoot.com