कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
Featured

कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

Abhay Puntambekar

२६१ जागांसाठी २९ मार्चला मतदान

कळवण । प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील एप्रिल – जून २०२० कालावधीत मुदत संपणार्‍या २९ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकी घेण्यात येत असून येत्या २९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत मतदान होणार आहे.

कळवण तालुक्यातील मेहदर, नरुळ, ओतूर, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बुद्रुक, सप्तशृंगी गड, मोहनदरी, नांदुरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, विरशेत, वडाळे हा., बोरदैवत, जामलेवणी, अभोणा, कळमथे पा., सावकी पाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे, काठरेदिगर, कनाशी, गोसराणे या २९ ग्रामपंचातींच्या एप्रिल २०२० व जून २०२० कालावधीत मुदत संपत असून ८४ प्रभागाच्या २६१ जागांसाठी २९ मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहे.

या निवडणुकीसाठी दि. ६ मार्च ते १३ मार्च पर्यंत सकाळी ११ वा. ते ३ वा दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. दि.१६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.

दि. १८ मार्च रोजी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दि.२९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजे पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.

दि.३० मार्च रोजी प्रशाकीय इमारत येथील सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com