Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइगतपुरी : आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरी : आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरी । प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने कामबंद व आरोग्य अधिकारी घेराव आंदोलन करणार असल्याचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांना दि. १० रोजी समितीच्या वतीने विविध मागण्या बाबत देण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रीय आरोग्य अभियाना मधील कंत्राटी कर्मचारी यांनी नियमित शासनसेवा समायोजन करीत दि. १९ मे पासुन राज्यात विविध प्रकारे आंदोलने करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत प्रथम टप्यातआंदोलन केले यात सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वता संरक्षण साहित्य न वापरता रूग्ण सेवा दिली. नंतर काळ्या फिती लावुन, पुढे रक्तदान करीत आता आरोग्य विभागातील अधिकारीं यांना घेराव घालुन अशी अंदोलने केली. राष्ट्रीय आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचारींना कायम करावे आणि शासन नियमाप्रमाणे समाविष्ट करावे आदि मागण्या बाबत हे आंदोलने केल्याचे समितीच्या समन्वयक संगिता सरदार यांनी सांगितले .

आंदोलनाच्या अंतिम टप्यात पुन्हा आंदोलक कर्मचारींना वेठीस न धरता दि. ११ रोजी पुर्वीच शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावात अन्यथा राज्यात आरोग्य विषयक आणीबाणी स्थिती निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी समिती समन्वयक संगिता सरदार, कुंदा राहारे, किरण शिंदे, मुख्य समन्वयक दिलीप उटाणे, बाजीराव कांबळे, अशोक जयसिंगपुरे, अरूण खरमाटे, वैशाली ढोणे, नुतन शिंदे, ए. ए. खेमनर, एस. एम. शिंदे, किशोर सोनवणे, टी. आर. चौधरी, श्रीमती देवराज, आय. एस. चौधरी, प्रतिभा बागुल, छाया सोनवणे, जे. एन. घाणे, भारती वानखेडे, सविता थोरात, मंगेश डावरे, शकील शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या