दिंडोरी, पेठ, निफाड तालुक्यांत चक्री वादळाचा तडाखा
Featured

दिंडोरी, पेठ, निफाड तालुक्यांत चक्री वादळाचा तडाखा

Abhay Puntambekar

नाशिक । तालुका प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात व शहरात वादळ व पाऊस असल्याने सर्व व्यवहार ठप्प पडली होती. सकाळी दहा वाजेपासून प्रात अधिकारी डा. संदिप आहेर यांनी चक्री वादळा बाबत दिंडोरी व पेठ तालुक्यातील सर्व गावांना सावधानातेचया सुचना दिल्या होत्या. त्यामुळे गाव पातळीवर जागृती होती. दिवसभर पाऊस सुरु राहिला.संध्याकाळी सातवाजेनंतर चक्रीवादळाचा सौम्य तडाखा दिंडोरी शहराला बसला. सुमारे बारावाजेपयत वादळाचा जोर होता. त्यानंतर वादळाचा जोर ओसरला. नाशिक- दिंडोरी रतयावर वादळामुळे वडाचे झाडं कोसळली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

निफाडला काल रात्री व आज पहाटे तालुक्यात झालेल्या निसर्ग वादळा सह पावसामुळे रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे ,अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली ,घरांची कौले, व पत्रे उडाली ,जनावरसाठीचे छप्पर कोसळले आहे,,गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातील अनेक शेतकऱ्याचे विद्युत पपं पाण्यात बुडाले आहे, शेतात उभे असलेले अनेक विद्युत पोल वाकले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com